sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : गुरुजींच्या देयकांचा प्रश्‍न अखेर मार्गी

वेतन आयोगाचा हप्ताही लवकरच

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांची कोट्यवधी रुपयांची विविध देयके थकली होती. त्यामुळे शासनाविरोधात शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेला आर्थिक तरतूद उपलब्ध करुन निधी वितरण पाठवले आहे.

त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी १९ कोटी ८८ लाख ६८ हजार; तर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठी ४ कोटी ६६ लाख एक हजार रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (ता. २२) शिक्षण उपसंचालक (अंदाज) देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीनिशी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वितरण आदेश निर्गमित करत आर्थिक तरतूद उपलब्ध केली.

त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी १९ कोटी ८८ लाख ६८ हजार रुपये; तर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठी ४ कोटी ६६ लाख १ हजार रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. प्रशासनाने आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, कैलास गायकवाड, विष्णु बोरूडे, संजय भुमे, बाबासाहेब जाधव, बळीराम भुमरे, हारूण शेख, सचिन एखंडे, प्रशांत हिवर्डे आदींनी समाधान व्यक्त केले.

लाभार्थी शिक्षकांना १ वर्ष उलटल्यानंतरही स्वतःच्या हक्काची रक्कम मिळत नाही हे दुर्देव आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वित्त प्रेषण उपलब्ध नसल्याचे कारण आहे. राज्यभरात सर्वत्र हिच परिस्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे. वेळच्या वेळी देयकांची पूर्तता झाल्यास लाभार्थी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. विविध प्रलंबित देयकांची आर्थिक तरतूद दरमहा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

- राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT