Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal Corporation sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : घरबसल्या भरा मालमत्ता कर, पाणीपट्टी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी अनेक मालमत्ताधारक वॉर्ड कार्यालयात येतात. मात्र आता त्यांना घरी बसून, कराची रक्कम भरता येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ई-गव्हर्नन्स अंतर्गत नव्या आर्थिक वर्षापासून मोबाईलवर मेसेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याव्दारे नागरिकांना विविध सुविधा मिळणार आहे.

ई-गव्हर्नन्स अंतर्गत शहरातील मालत्ताधारकांचे मोबाईल नंबर लिंक करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाच एप्रिलपासून नागरिकांना विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी मेसेज येईल. यासाठी स्मार्ट सिटीने https://www.aurangabadmahapalika.org/ हे पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलअंतर्गत नागरिकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक पेमेंट गेटवे लिंक येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना आपली घरपट्टी व पाणीपट्टी किती आहे, ती रक्कम दिसेल. याच लिंक वरून नागरिकांना युपीआय व क्यूआरद्वारे बिल भरणे सहज शक्य होईल. यामुळे नागरिकांना वॉर्ड कार्यालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही, असे स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगिते.

या सुविधेमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. घरबसल्या सहज आणि सुलभ पद्धतीने कर भरणे शक्य होईल. तसेच पोर्टल वरून नागरिक महापालिकेशी निगडीत तक्रारीही नोंदवता येतील, या तक्रारींचे वेळेवर निवारण करता येईल, यंत्रणा तयार करण्यात आल्याचे फैज यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT