छत्रपती संभाजीनगर

ज्येष्ठांनो, पेन्शनच्या कामासाठी लाच मागितल्यास ‘१०६४’ वर बिनधास्त करा तक्रार

CD
युटिलिटी न्यूज ------------ ज्येष्ठांनो, पेन्शनसाठी तुम्हाला लाच मागितल्यास ‘१०६४’ वर करा तक्रार छत्रपती संभाजीनगर : पेन्शनसंदर्भातील कामे करून देण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास घाबरून जाऊ नका. त्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करावी. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वरही संपर्क साधता येईल, असा सल्ला विभागातर्फे ज्येष्ठांना देण्यात आला. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयातर्फे गुरुवारी (ता.२९) निवृत्त नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. यात जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदविला होता. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करणे, पेन्शनविषयक कागदपत्रांची पूर्तता, प्रलंबित प्रकरणे तसेच अन्य शासकीय कामांसाठी विविध कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो. अशा वेळी एखादा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याने काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास त्याला बळी पडू नका, उलट एसीबीशी संपर्क साधा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर, पीआय अमोल सोनवणे, पीआय प्रतिभा आबूज यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, उपाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, सचिव नामदेव घुगे, सहसचिव पी.बी. क्षीरसागर, सदस्य रजनी नागवंशी, प्रमिला कुंभारे, लकेकर आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जास्तीत जास्त झाडे वाचवून नवीन लागवडीवर भर देणार"

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

SCROLL FOR NEXT