Petrol diesel price
Petrol diesel price sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत पेट्रोल १२०, तर डिझेल १०४ रुपये लिटर; ग्रामीणपेक्षा शहरात दर जास्त

प्रकाश बनकर

औरंगाबाद : देशात चार राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ सुरु झाली आहे. औरंगाबादेत (Aurangabad) २२ मार्च रोजी पेट्रोल ११३.३० रुपये लिटर होते. ते रविवारी (ता.तीन) १२० रुपये प्रतिलिटरवर गेले. गेल्या तेरा दिवसांत पेट्रोल हे ६ रुपये ७० पैशांनी प्रतिलिटर मागे वाढ झाली आहे. तर डिझेलमध्येही ६ रुपये ४८ पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ अजून होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांतर्फे वर्तविण्यात येत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेन या देशात सुरु असलेल्या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्यामुळे सर्वत्र इंधनाच्या किमती वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Petrol Diesel Prices In Aurangabad, High Price In City Compare To Rural Area)

मात्र, चार राज्यांतील निवडणुकांमुळे ही दरवाढ तात्पुरती थांबविण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांत एक ते दोन दिवसाआड नियमित काही पैशांनी दरवाढ सुरु करण्यात आली. देशात कोरोना (Corona) संसर्ग आल्यापासून सर्वकाही गोष्टींचे दर भरमसाट वाढले आहेत. शंभरी आत असलेले खाद्यतेलांच्या किमती १६० रुपये ते २०० रुपयांच्या घरात गेले आहेत. याच बरोबर इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे दळवळण, वाहतुकीच्या खर्चांत वाढ झाल्याने सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेक उद्योग बंद पडले. अनेकांच्या पगार कपाती करण्यात आल्या. (Petrol Diesel Prices In Aurangabad)

आता कुठे सर्वसमान्य कोरोनातून सावरत असताना इंधनाचे वाढणारे दर हे सर्वसामान्यांचे बजेट कोलमाडणारे ठरत आहे. शहरात रविवारी १२० रुपये प्रतिलिटर पेट्रोल (Petrol), तर १०४. २३ रुपये प्रतिलिटर डिझेल विक्री झाले. तर ग्रामीणमध्ये ११९.१३ रुपये पेट्रोल तर डिझेल १०१.८१ रुपयांनी विक्री झाले. शहरात ब्युटी टॅक्स लागत असल्याने पेट ग्रामीणपेक्षा शहरात पेट्रोलचे दर जास्त असते.

तारीख--------- पेट्रोल--------------- डिझेल

२२ मार्च------११३.३० रुपये----------९७.४८ रुपये

२७ मार्च-------११५.४७ --------------९९.७९

२८ मार्च-------११५.७९---------------१००.७२

२९ मार्च-------११६.६३----------------१००.८४

३० मार्च------११७.४८-----------------१०१.६९

३१मार्च -------११८.३२----------------१०२.५४

१एप्रिल--------११८.३२----------------१०२.५४

२ एप्रिल-------११८.१६----------------१०३.३८

३ एप्रिल-------१२०-------------------१०४.२३

(प्रतिलिटर : स्रोत पेट्रोल-डिझेल असोसिएशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT