second dose of corona vaccine sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुन्हा चर्चेत; पेट्रोल-गॅस, दारूसाठी दुसरा डोस आवश्‍यक

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण : जिल्हा निर्बंधमुक्त करण्यासाठी लसीकरण अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पहिल्या आणि दुसऱ्या डोसची टक्केवारी कमी असल्याने जिल्हा निर्बंधमुक्त होऊ शकला नाही. जिल्हा निर्बंधमुक्त करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, गॅस सिलेंडर एवढेच नव्हे तर दारू हवी असेल तर लसीकरणाचा दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. सेतू सुविधा केंद्रातून कोणतेही प्रमाणपत्र घेण्यासाठी दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. मंगळवार (ता.आठ) पासूनच याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची सोमवारी (ता. सात) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष पथकची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये महसूल , पोलिस,आरोग्य कर्मचारी आहेत. हे पथक लसीकरणाचा दुसरा डोस पात्र असूनही डोस न घेतल्याबाबतची तपासणी करून संबधित सुविधा न देण्याची कारवाई बाबत काम करणार आहे. ही कार्यवाही पेट्रोलपंप, घरगुती गॅस सिलेंडर, वितरण एजन्सी, रेशनवरील स्वस्त धान्य दुकान, मॉल, हॉटेल, मोठी दुकाने या ठिकाणी भरारी पथकाद्वारे तपासणी केली जणार आहे.

रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी लसीकरण अनिवार्य करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी यांनी नागरिकांची कोविन ॲपवरील नोंदणी अद्यावयत करुन लसीकरण झाल्याची नोंद करावी, तसेच १५ मार्च पर्यंत लसीरकणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबधित उपस्थितांना देण्यात आल्या . जिल्हयातील ८ लाख ९० हजार ९४१ लसीचा दुसरी मात्र घेण्यासाठी पात्र असण्याऱ्या नागरिकांनी तात्काळ लस घेण्याबाबतचे आवाहनही प्रशासनामार्फत श्री. चव्हाण यांनी केले.

समन्वय ठेवा : मीना शेळके

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत ग्रामीण भागातील लसीकरण उद्दिष्टपुर्तीसाठी ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय ठेवून तात्काळ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश दिले. बैठकीला महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक निमीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय

  • शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, मार्ट आणि मोठ्या दुकानात दुसऱ्या डोसचे लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य.

  • लसीकरणाची टक्केवारी वाढेपर्यंत निर्बंध राहणार आहेत.

  • वीज गेली असेल, वीज जोडणी करायची असेल, वीजेशी संबंधित महावितरणकडे कोणतीही तक्रार करायची असेल तर तक्रारदाराचा दुसरा डोस झाला पाहिजे.

  • पेट्रोल पंपांवर दूसरा डोस घेतलेल्यांची तपासणी केली जाणार. वाद टाळण्यासाठी असेल पंपांवर असतील पोलिस कर्मचारी.

  • सध्या प्रत्येक आस्थापनांना एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे बंधन करण्यात आले आहे. शंभर टक्के निर्बंधमुक्तीसाठी लसीकरण आवश्‍यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update: महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर-बालेवाडीत चार पार्किंग

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

SCROLL FOR NEXT