छत्रपती संभाजीनगर

पेट्रोल पंपांवरील सुविधां तपासणीचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश

CD
ABD26J80914 ------------------ ‘सकाळ’इम्पॅक्ट लोगो ------------------- ग्राहकांना सुविधा नाकारणाऱ्या पेट्रोल पंपांची होणार कडक तपासणी -- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश ः सविस्तर तपासणी अहवाल सादर करण्याचे सेल्स ऑफिसरला निर्देश -- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ७ ः शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत नागरी सुविधांचा फज्जा उडाल्याबाबत ‘सकाळ’मध्ये टाकी फुल्ल... सुविधा गुल!’ या मथळ्याखाली २५ सप्टेंबरला प्रकाशित झालेल्या वृत्ताची, तसेच ‘कुठेय सुविधा?’ या वृत्तमालिकेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सर्व तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तेल कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. ‘सकाळ’मध्ये २५ सप्टेंबरला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर सोयीसुविधांचा अभाव असल्याचे ‘ग्राऊंड रिपोर्ट’मधून समोर आणले होते. गैरसोयींबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच बातमीचा संदर्भ देत जिल्हा पुरवठा विभागाने हे आदेश मंगळवारी (ता. सहा) जारी केले. पेट्रोल पंपांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याचे कुलर दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवणे किंवा पाण्याची सोयच नसणे, टायरमध्ये हवा भरण्याची यंत्रणा बंद असणे किंवा मोफत हवेसाठी ग्राहकांकडून बेकायदेशीरपणे ५ ते १० रुपये उकळले जाणे, स्वच्छतागृहांना कुलूप असणे अथवा ती अत्यंत अस्वच्छ असणे, तसेच दर्शनी भागात तक्रार नोंदवही व इंधनाचे दरफलक नसणे, अशा गंभीर त्रुटी ‘सकाळ’च्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आल्या होत्या. त्यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यावर ऑइल कंपन्यांचे नियम आणि शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांना शुद्ध पिण्याचे पाणी, मोफत हवा, स्वच्छ व वापरण्यायोग्य स्वच्छतागृह, तक्रार नोंदवही आणि दरफलक या सुविधा पुरवणे प्रत्येक पेट्रोल पंपचालकावर बंधनकारक आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. -- चौकट -- पंपचालकांना सूचना द्या -- या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपांची तातडीने तपासणी करावी. ज्या पंपांवर या सुविधा आढळणार नाहीत, त्या पंपचालकांना त्वरित सूचना द्याव्यात, तसेच संबंधित ऑइल कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांच्या (सेल्स ऑफिसर्स) निदर्शनास आणून देऊन कारवाईचा सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT