छत्रपती संभाजीनगर

पेट्रोल पंपांवरील सुविधांचा आता ‘हिशेब’!

CD
पेट्रोल पंपांवरील सुविधांचा आता ‘हिशेब’! ---- ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची बैठक; कारवाईकडे लक्ष ---- कळंब, ता. २२ (बातमीदार) : पेट्रोल पंपांवर ग्राहकांना शौचालय, पिण्याचे थंड पाणी आणि वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सप्टेंबर महिन्यात ‘सकाळ’ने सातत्याने या समस्येला वाचा फोडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. २२) अनिवार्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवरील सुविधा प्रत्यक्षात सुरू आहेत की केवळ कागदोपत्री, याची पडताळणी होण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चारला ही बैठक होणार आहे. पेट्रोल-डिझेल पंपांवरील अनिवार्य सुविधा, जिल्ह्यातील एलपीजी गॅसचा पुरवठा व रास्त भाव दुकानांशी संबंधित माहिती घेण्यासाठी संबंधितांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. --- सुविधांचे फलक; प्रत्यक्षात ग्राहकांची फरफट इंधनासाठी पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकदा शौचालय वापरण्यास मिळते का, पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का आणि हवा भरण्याची सुविधा सुरू आहे का, असे प्रश्न उपस्थित होतात. काही ठिकाणी सुविधा असूनही त्यांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारींचीही तपासणी होणे आवश्यक आहे. ‘कुठेय सुविधा?’ या भूमिकेतून ‘सकाळ’ने ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. --- केवळ बैठक नको, प्रत्यक्ष तपासणी हवी! बैठकीत माहिती घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष तपासणी करणे गरजेचे आहे. सुविधा बंद असतील किंवा ग्राहकांना त्यांचा वापर करता येत नसेल, तर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाच्या बैठकीतून ठोस निर्णय होणार की केवळ आश्वासनांवरच समाधान मानले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी, बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

IND vs NZ 1st T20I: भुवनेश्वर कुमारच्या 'कमबॅक'ची चर्चा... पण न्यूझीलंड फलंदाजांचा दबदबा, भारतासमोर सर्वोच्च धावसंख्या...

SCROLL FOR NEXT