छत्रपती संभाजीनगर

प्लास्टिकचा सर्रास वापर

CD
प्लॅस्टिकबंदी कागदावरच! सहा दुकानदारांना २३ हजारांचा दंड; कारवाई थंडावताच वापर सुरू ----- धाराशिव, ता. ११ (बातमीदार) : शहरातील रस्त्यांवर आणि कचराकुंड्यांजवळ साचलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पालिकेने काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबवून कारवाई केली होती. मात्र, ही मोहीम थंडावताच प्लॅस्टिकचा वापर पुन्हा सुरू झाला. शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि अन्य प्लॅस्टिकजन्य वस्तू मोठ्या प्रमाणात आढळतात. पालिकेकडून कचरा उचलला जात असला, तरी तो उघड्यावर पडून असताना वाऱ्यामुळे प्लॅस्टिक नाल्यांमध्ये वाहून जाते. तसेच रस्त्यालगतच्या झुडपांच्या फांद्यांमध्ये अडकलेले प्लॅस्टिकही नंतर नाल्यांत पडते. शहरातील बहुतांश रस्त्यांच्या कडेला अशीच परिस्थिती दिसून येत आहे. ----- प्लॅस्टिकचा वाढला वापर शहर पलॅस्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने गेल्या महिन्यात विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान पथकाने विविध बाजारपेठांतील दुकानांची अचानक तपासणी केली. काही दुकानदार ग्राहकांना साहित्य देण्यासाठी प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याचे आढळले. त्यानंतर सुमारे २५० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तर सहा दुकानदारांकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. ----- घंटागाडी असूनही कचरा रस्त्यावर कचरा संकलनासाठी पालिकेची घंटागाडी थेट घरापर्यंत येत असतानाही काही नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्याच्या कडेला उघड्यावर फेकत आहेत. या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग आणि अन्य प्लॅस्टिकजन्य वस्तूंचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत आहे. ----- OSM26B07155 धाराशिव : शहरातील रस्त्यालगत साचलेला कचरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT