छत्रपती संभाजीनगर

१.७९ लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा दिलासा!

CD
ABD26J82431 गिरगाव (ता. वसमत) ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ---------------------- दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार ------------ पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता वितरीत, जिल्ह्यात १.७९ लाख लाभार्थी ----- सकाळ वृत्तसेवा हिंगोली, ता. ३१ : ऐन दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार ६५९ शेतकऱ्यांचा समावेश असून, प्रत्येक लाभार्थींच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. केंद्र शासनाची पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. शेतीच्या मशागतीपासून ते बियाणे, खते आणि दैनंदिन गरजांसाठी या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना होतो. यंदा जिल्ह्यात पावसाने ऐन खरीप हंगामात दगा दिल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या तोंडावर खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. -------- ‘नमो शेतकरी’च्या हप्त्याकडे लक्ष केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य शासनाकडूनही पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दुष्काळी परिस्थितीत दोन्ही योजनांचे हप्ते वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे राज्य शासनाच्या पुढील हप्त्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ---------- ((कोट)) पावसाअभावी यंदा पिके हातची गेली आहेत. त्यामुळे अल्पभूधारकसह मोठा शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता खात्यावर जमा केल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. आता राज्य शासनानेही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जमा करावा. - रामेश्वर जोजार, शेतकरी --------------- ((कोट)) दिवाळी तोंडावर असून, तयारी सुरू झाली आहे. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकरी, शेतमजूर वर्ग अडचणीत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा झाल्याने दिलासा मिळाला आहे. आता नमो शेतकरी सन्मान निधी आणि राज्य सरकारने जाहीर केलेले पाच हजारांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळण्याची आशा आहे. - पिराजी घुगे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

Supreme Court: 'ब्रेकअपनंतर पूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार...', सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Youtube वर २.७७ कोटी, इन्स्टावर ७० लाख फॉलोअर्स; पण पत्नीला मिळाली अवघी २७७ मते

नालासोपारा दुर्घटना! पोलिसांनी केला पंचनामा; लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली?

Marathi News Live Updates : बारामतीत यंदा पाडव्याचा पारंपरिक सोहळा रद्द! शरद पवारांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी न करण्याचा भावनिक पवित्रा

SCROLL FOR NEXT