मुरमा (ता.पैठण, जि.औरंगाबाद ) : सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाऊण लाखाच्या अवैध दारूसह पाच लाखांची कार जप्त केली. 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडले

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) - चारचाकी आलिशान कारमध्ये अवैधरित्या ७६ हजार आठशे रुपयांची देशी दारु वाहतूक करणाऱ्यास पाचोड (ता.पैठण) (Paithan) पोलिसांनी गजाआड करुन दारूसह पाच लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (ता.२१) औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता.पैठण) शिवारात घडली. अधिक माहीती अशी की, धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारातील हॉटेल (Crime In Aurangabad) अमृतसमोर एक चारचाकी कारमध्ये (एमएच २० एफजी ०१४०) देशी दारुचा अवैधरित्या मोठा साठा वाहून नेला जात असल्याची माहीती पाचोड पोलिस ठाण्याचे (Pachod Police Station) सहायक पोलिस निरीक्षक गणेश सूरवसे यांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक गोरखनाथ कणसे, श्री. पगारे, भगवान धांडे आदींना घेऊन संबंधीत ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संबंधीत कार चालकाने वाहनासह पळ काढला.

मात्र पोलिसांनी 'त्या' कारचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात अवैधरित्या देशी दारूचे २० बॉक्स वाहून नेले जात असल्याचे आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ७६ हजार ८०० रुपये असून पोलिसांनी नवनाथ श्रीमंत बोडखे (वय 33, रा.चिंचाळा, ता.पैठण) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ही दारु औरंगाबाद येथे बायपासवरील हॉटेलसाठी विक्रीसाठी जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी चारचाकी कारसह एकूण पाच लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नवनाथ बोडखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT