पैठण तालुक्यातुन मराठा संघर्ष मोर्चाला जाणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. 
छत्रपती संभाजीनगर

मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पकडून केले स्थानबद्ध

ज्ञानेश्‍वर बोरूडे

बिडकीन पोलिसांनी पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील बिडकीन बसस्थानक परिसरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी, स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांना स्थानबद्ध केले आहे.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : बीड (Beed) येथील मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) इतर मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा संघर्ष मोर्चात सामील होण्यासाठी व रायगड येथे शिवस्वराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Thok Morcha) व स्वाभिमानी छावा संघटनेचे समन्वयक, जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांना बिडकीन, पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी (Paithan MIDC Police) पकडून स्थानबद्ध केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी बीड येथे शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.पाच) निघणाऱ्या मोर्चात व रायगड येथील शिव स्वराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणारे ढाकेफळ येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक किरण पाटील काळे यांना आज शनिवारी सकाळी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या अर्चना पाटील, गुप्त शाखेचे राम मारकळ, पोलिस पाटील गोकुळ आढाव यांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. (Police Arrested Maratha Morcha's Office Bearers In Paithan)

बिडकीन पोलिसांनी (Bidkin Police) पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील बिडकीन बसस्थानक परिसरातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, धनंजय चिरेकर, गणेश कळसकर, अभिजित लोणकर, विजय शेळके, अप्पासाहेब जाधव यांना बिडकीन पोलिस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, फौजदार विकास पाटील, गुप्त शाखेचे भगवान जाधव यांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT