थुंकण्यास मनाई केल्यामुळे
पोलिसांना शिवीगाळ, हल्ला
--
पंधरा जणांच्या टोळक्यावर गुन्हा
--
धाराशिव, ता. २९ : तुळजाभवानी मंदिराच्या आवारात आणि मंदिर परिसरात मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत खुर्ची मारून किरकोळ जखमी केले. तुळजापूर पोलिस ठाण्यात १५ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर चौकीचे प्रभारी पोलिस निरीक्षक तथा फिर्यादी बालाजी वसंतराव येवते आणि त्यांचे साथीदार नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत होते. १९ ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास, काही जण दारू पिऊन आणि तंबाखू खाऊन परिसरात थुंकत होते. येवते यांनी त्यांना मंदिर परिसरातून बाहेर काढले. या रागाने संशयितांनी एकत्र येत येवते व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. पोलिसांवर खुर्ची फेकून मारून त्यांना किरकोळ जखमी केले. येवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (ता.२८) तुळजापूर पोलिस ठाण्यात क्रांती भीमराव कदम (वय ४०), हर्ष दीपक कदम ( २५), आदित्य दीपक कदम (२४), संदेश जितेंद्र कदम (२४) आणि अन्य ११ अशा १५ संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.