Theft in ca 
छत्रपती संभाजीनगर

मेहुण्याने पळविली पोलिस भावजींची कार

पोलिस मुख्यालयाच्या पार्किंगमधून कार घेऊन फरार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - एकीकडे पोलिस दलात असलेले भावजी घराच्या शोधात असताना दुसरीकडे पाहूणे म्हणून आलेल्या मेहुण्याने पोलिस दलातील भावजींची सात लाखांची नवी कोरी कारच पळवून नेली. विशेष म्हणजे ही कार औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाच्या पार्किंमधून लंपास करण्यात आली. याप्रकरणी संशयित मेहुणा, सासू, सासरे या तिघांविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शुभम राजेंद्र अहिरे असे त्या संशयित आरोपी मेहुण्याचे तर राजेंद्र दौलत अहिरे व सासू (तिघेही, रा. आनंद लॉन्सच्या पाठईमागे, मोरेनगर, सटाणा, जि. नाशिक) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३३ वर्षीय फिर्यादी हे औरंगाबाद पोलिस दलातील एका तालुक्याच्या पोलिस ठाण्यात नाईक पदावर काम करत असून ते पत्नीसह सिडकोतील एन-८ येथे मागील एक महिन्यांपासून राहतात. फिर्यादीकडे त्यांच्या नातेवाइकांची असलेली (एमएच-१५ एचजी-२७८१) ही कार फिर्यादीने ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या संरक्षित पार्किंगमध्ये लावली आणि १० जून रोजी कामानिमित्त मुंबई आणि तिकडून तिकडेच सामान शिफ्ट करण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी गेले.

दरम्यान, १८ जून रोजी फिर्यादी नोकरीच्या ठिकाणी असताना त्यांच्या नातेवाइकांचा फोन आला आणि त्यांनी ‘दुपारी पावणे तीन वाजता हतनूर टोलनाका येथून आपली गाडी पास झाली आहे’ असे सांगितले. तसा फास्ट टॅगचा मेसेजही मिळाला. दरम्यान फिर्यादीने तत्काळ औरंगाबाद गाठून पार्किंगमध्ये कार पाहिली असता दिसली नाही, तिथून सिडकोतील घर पाहिले असता, घराला कुलूप दिसले, दरम्यान शेजाऱ्यांकडे ठेवलेली घराची चावी घेऊन घरात नेहमीच्या ठिकाणी कारची चावी पाहिली असता, चावीही दिसली नाही. त्यामुळे पाहूणे म्हणून आलेल्या मेहुणा, सासू, सासरे हेही दिसले नाहीत. त्यामुळे मेहुण्याला फोन केला असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान, शेजाऱ्यांनी तुमचे सासू सासरे तुमची कार घेऊन गेल्याचे सांगितले. याप्रकरणी वरील तिघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT