गांजाविक्रीवर पोलिसांचा छापा;
सव्वा किलो गांजासह रोपे जप्त
मुखेड, ता. ४ (बातमीदार) : देगलूर उपविभागीय पोलिस पथकाने मुखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून अवैधरीत्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. कारवाईत १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा तसेच १२५ ग्रॅम वजनाची गांजाची हिरवी रोपे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची शासकीय किंमत २५ हजार रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी किरण पोपळघट यांनी दिली.
उंद्री, पं.दे. (ता. मुखेड) येथील सुधाकर संतुकराव वडजे याच्या घरी गुरुवार (ता. तीन) मध्यरात्री पोलिस पथकाने झडती घेतली. यावेळी घराच्या अंगणातील एका ठिकाणी वाळलेल्या गांजाचे शेंडे व चुरा तसेच गांजाची हिरवी रोपे आढळून आली.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचे वजन केल्यानंतर वाळलेल्या गांजाचे वजन १ किलो ११५ ग्रॅम, तर हिरव्या गांजाच्या रोपांचे वजन १२५ ग्रॅम भरले. या प्रकरणी सुधाकर संतुकराव वडजे याच्याविरुद्ध मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चिंताबर कामठेवाड, पोलिस उपनिरीक्षक अभिजित तुतुरवाड, पोलिस अंमलदार रवींद्र भुले, अमोल सुंडगे, प्रवीण कुरे तसेच पोलिस उपनिरीक्षक म्हैसनवाड, अंमलदार विशाल आटकोरे, माधव मरगेवाड व रिहाना शेख यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.