छत्रपती संभाजीनगर

१० लाख लुटणारे आरोपी ४८ तासांत जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

संजय जाधव

याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

कन्नड (औरंगाबाद) : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (district central bank) तब्बल दहा लाख रुपये लुटीतील आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४८ तासात आवळल्या असून दहा लाखांपैकी सहा लाख ५१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून शनिवारी(ता.०८) पाच आरोपींना जेरबंद केले आहे. सर्व आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (Police have arrested the accused for stealing Rs 10 lakh from the district central bank)

याप्रकरणी सिद्धार्थ उर्फ पिंटू मच्छिंद्र सोनवणे (वय ३४), विनोद उर्फ विनू मच्छिंद्र सोनवणे (१८), प्रवीण ऊर्फ बाळू विश्वनाथ पंडित (वय २१ रा. चंद्रलोक नगरी), अमोल ज्ञानेश्वर जाधव (वय १९, रा. इंदिरा नगर) व एक विधिसंघर्ष बालक अशा एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे तर शाहरुख शहा हा फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (ता.६) दुपारी जिल्हा बँक शाखा वडनेर येथील शिपाई बी. के. बावसकर हे कन्नड येथील मुख्य शाखेतून १० लाख रुपये घेऊन वडनेर येथे जात असताना तीन जणांनी जामडी शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी आडवी लावून लाथा बुक्क्याने मारहाण करून तोंडावर मिरची पूड फेकून १० लाखाची रोकड लांबविली होती. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरविली असता सिद्धार्थ उर्फ पिंटू मच्छिंद्र सोनवणे (वय ३४, रा.चंद्रलोक नगरी) याने साथीदारांसह हे कृत्य केल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने सांगितले की, फिर्यादी बावस्कर हा नेहमी बँकेतून पैसे ने आण करत असल्याचे माहिती होते. त्यामुळे विनोद ऊर्फ विनू सोनवणे, शाहरुख शहा, प्रवीण ऊर्फ बाळू पंडित, अमोल जाधव, व एक विधिसंघर्ष बालक यांना ठरविले. तसेच विनोद, शाहरुख आणि आणखी एकास लुटण्यासाठी पाठविले. इतर तिघे लोकेशनवर होते.

त्यानुसार इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून लुटलेल्या रकमेपैकी ६ लाख ९१ हजार ५०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ८ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक सुनील नेवसे, पोलिस उपनिरीक्षक संदीप सोळुंके, गणेश राऊत, सहा.फौजदार वसंत लटपटे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विक्रम देशमुख, संजय तांदळे, किरण गोरे, संजय काळे, नामदेव शिरसाट, पो.ना.शेख नदीम, संजय भोसले, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संतोष डमाळे यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नेवसे, पोलिस उपनिरीक्षक भिवसने हे करीत आहे.

(Police have arrested the accused for stealing Rs 10 lakh from the district central bank)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT