औरंगाबाद : दुचाकी चोऱ्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दुचाकी चोऱ्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

दररोज दोन ते तीन वाहनांची चोरी : तोंडी किंवा बॉँडपेपरवर विक्रीचा फंडा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात दररोज दोन ते चार दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे. एकीकडे पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचे सत्र सुरु आहे. तरीही दुसरीकडे मात्र हे दुचाकी चोरीचे सत्र थांबत नाही. हाकटेक टेक्नोलॉजीमुळे चोरीचे वाहन तत्काळ ट्रेस होते, तरीही दुचाकी चोरी होते हे वास्तव आहे. अशी चोरीचे वाहने गरजूंना ग्रामीण भागात सर्रास बाँडपेपरवर विक्री केली जात असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळेच पोलिसांची डोकेदुखी कायम आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरात दररोज विविध भागातून किमान दोन दुचाकी चोरी होत आहेत. दुचाकीस्वाराने उभी केलेली दुचाकी अवघ्या काही मिनिटांमध्ये पळवून नेली जात आहे. याबाबत माहिती घेतली असता दुचाकीस्वाराने दुचाकी उभी केल्यानंतर पाळत असलेल्या चोरट्याकडून लगेच काही क्षणात दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडले जाते, अनेक दुचाकीचे लॉक गुळगुळीत झालेले असल्याने दुसऱ्या चावीने (डुप्लिकेट) सहज उघडते. त्यानंतर दुचाकी डायरेक्ट केली जाते.

दुचाकी डायरेक्ट करताना वायरिंग लुमचे सॉकेट काढण्यापासून तर कोणत्या वाहनाचे कोणते वायर तोडणे अथवा जोडावे लागते हे दुचाकीचोरांना चांगलेच अवगत असते. प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी डायरेक्ट करण्याचे फंडेही वेगवेगळे असतात, त्यानुसार चोरट्यांकडून त्या ट्रिक्स वापरल्या जातात. हे सर्व करत असताना अनेकांना हा दुचाकी चोर आहे, याची पुसटशी कल्पनाही येत नाही.

दुचाकी चोरी अवघड तरीही

परिवहन सेवा ऑनलाइन झालेली असल्याने कुठलेही वाहन सहज ट्रेस होते. पोलिसांकडील ॲपवर किंवा ई-चलान यंत्रावर क्रमांक टाकला की दुचाकीची सर्वच कुंडली समोर येते. त्यामुळे क्रमांकाची खाडाखोड करुन किंवा मुळ क्रमांकाऐवजी दुसरा क्रमांक टाकून दुचाकी चालवणारा पोलिसांच्या किंवा आरटीओच्या तपासणीत क्षणार्धात पकडला जातो. मात्र, असतानाही दुचाकी चोरीचे सत्र थांबत नाही ही खरी पोलिसांची डोकेदुखी आहे.

गरीब, गरजू ग्राहकांना विक्री

चोरीची दुचाकी ही आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू आणि नडलेल्या ग्राहकाला विकली जाते. असे व्यवहार तोंडी किंवा बॉण्डपेपर केले जातात. सत्तर, ऐंशी हजाराची दुचाकी वीस-तीस हजार रुपये घेऊन विक्री केली जाते, दहा- वीस हजार रुपये बाकी ठेवून कागदपत्र दिल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याची बोली असतो. मात्र, एकदा दुचाकी विकली की पुन्हा कागदपत्रही मिळत नाहीत. ग्रामीण भागात अशी दुचाकी कुणी पकडतही नाही.

"औरंगाबाद पोलिसांनी दुचाकी चोरीच्या अनुषंगाने अधिक सतर्कता बाळगलेली आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार तांत्रिक बाबींचा वापर सुरु असल्याने तब्बल १५० दुचाकी चोरटे अटक करून त्यांच्या ताब्यातून वाहने जप्त केले आहेत. चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात चालवल्या जातात, अशी दुचाकी शहरात आली तर पकडली जाते."

- अविनाश आघाव, पोलिस निरिक्षक, गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT