छत्रपती संभाजीनगर

मी पोलिस आहे, स्पोर्ट खेळण्यासाठी शहरात आलोय.....

CD
मी पोलिस आहे, स्पोर्ट खेळण्यासाठी शहरात आलोय..... छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः ‘‘मी पोलिस आहे, स्पोर्ट खेळण्यासाठी शहरात आलोय.’’ असे म्हणत त्याने तब्बल १६ दिवस लॉजवर मुक्काम ठोकला. परंतू या १६ दिवसांत एकही दिवस ‘तो’ पोलिसांसारखा वागला नाही. त्याच्या ‘धतिंग’पणामुळे लॉजचालकाला संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी येऊन तपासणी केली आणि तो तोतया पोलिस असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्याच्याकडे खऱ्याखुऱ्या पोलिसांसारखे साहित्य आढळून आल्याने पोलिसही चक्रावले होते. हा प्रकार २८ सप्टेंबर ते १३ ऑक्टोंबरदरम्यान सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये घडला. त्याला पोलिसांनी अटक केली असून राहूल रोहिदास सातकर (३१, रा. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे त्या तोतयाचे नाव आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. यासंदर्भात सिटी चौक पोलीस ठाण्याचे हवालदार आनंद वाहूळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी राहूल हा शहरातील सिटीझन लॉजमध्ये २७ सप्टेंबर रोजी तारखेला आला होता. त्याने आपण पोलिस असल्याचे भासवत, खोट्या ओळखपत्राच्या आधारे लॉजवर रुम घेतली. आपण शहरात स्पोर्ट खेळण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगत लॉजचालकाचा विश्‍वास संपादन केला. ---- एकच चर्चा....हा पोलिसच कसा? ---- २७ सप्टेंबरपासून पोलिसाला लॉजचालकाने खोली दिली खरी, परंतू, बाहेरगावाहून आलेला पोलिस हा पोलिसांसारखा वागतच नव्हता. अख्या लॉज परिसरात तो रोजच ‘धतिंग’ करत असे. रोजच दिवसभर या धतिंगची चर्चा होऊ लागली. अखेर लॉजचालकाला संशय आल्याने त्याने पोलसांना कळविले. त्यावर उपनिरीक्षक संजय राठोड, फौजदार मुनिर पठाण, आनंद वाहूळ, मंगेश पंडीत आदिच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक मिसाळ करत आहेत. ---- वर्दीचे सर्वच आर्टिकल सापडले --- आरोपी राहूलकडे महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीचे सर्वच आर्टिकल सापडले. यामध्ये पोलिसांचा लोगो, लेसबद्दलचे दोन खाकी गणवेश, वेगवेगळ्या नावांच्या चार नेमप्लेट, चामडी बेल्ट, डीमएस शूज, पिस्टल पाऊच, पोलीस लिहिलेली पांढरी पी कॅप, रेनकोट, कमांडो व क्यूआरटी लिहिलेले टी-शर्ट्स, परेडचे साहित्य तसेच दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. --- ((कोट)) आरोपी राहुल याच्याविरोधात इतर जिल्ह्यात विनयभंग किंवा लैंगिक छळ, शिविगाळ करणे, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, पोक्सोसह चोरी, शांतता भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. - सचिन सानप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिटी चौक पोलिस ठाणे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT