दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गावभेटी
----
जिल्ह्यात ७९ ठिकाणी चार हजार नागरिकांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ८ ः कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य सामाजिक व दैनंदिन समस्यांना सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ता. १ ऑक्टोबर २०२६ पासून ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ७९ गावांना भेटी देऊन चार हजार १८२ नागरिकांशी पोलिसांनी थेट संवाद साधला आहे.
कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाई, रोजगाराची समस्या, स्थलांतर, शेतकरी व कुटुंबीयांशी संबंधित विविध सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य परिस्थितीचा सामना नागरिकांनी एकत्रितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसा करावा, याबाबत गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यात गावागावात जाऊन पोलिस नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्या, त्यांचे सामाजिक परिणाम आणि त्या समस्या निर्माण होण्यापूर्वी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, याबाबत गावकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. या संवादातून प्रत्येक गावाची स्थानिक परिस्थिती समजून घेऊन त्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.