Aurangabad Police Seized 37 Swords (Photo Credit - Sachin Mane) esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, कुरिअर कार्यालयातून ३७ तलवारी जप्त

औरंगाबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आज बुधवारी (ता.३०) निराला बाजारातील डीटीडीसी कुरिअर कार्यालयावर छापा टाकला. त्यात पार्सल बाॅक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी (Swords) जप्त करण्यात आल्या. औरंगाबाद आणि जालना येथील सात ग्राहकांचे पत्ते सदरील पार्सलवर आढळले आहेत. सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्याकडून कुरिअरने औरंगाबादमध्ये ((Aurangabad)) तलवारी आल्याची माहिती मिळाली. (Police Raid On Currier Office, Seized 37 Swords In Aurangabad)

या माहितीवरुन क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत दराडे, पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने डिटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. व्यवस्थापकाने खरी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांना पार्सल बाॅक्समध्ये तलवारीचा साठा आढळला.

पोलिस निरीक्षक दराडे म्हणाले, की सात ग्राहकांनी तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे , तर दोघे जालन्याचे ग्राहक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT