sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कॉफी कॅफेंवर पोलिसांचे छापे

वाळूज महानगरातील चौकांमध्ये तीन जोडप्यांसह दोन मालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूज महानगर परिसरातील महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, कोलगेट चौक, मोरे चौक, जयभवानी चौक ही वर्दळीची ठिकाणे. या परिसरात कॉफी कॅफेंवर सर्वाधिक गर्दी होते. याविषयी तक्रारी आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने शनिवारी (ता.९) छापे टाकले. यात महाराणा प्रताप चौकातील दोन ठिकाणी तीन जोडपी विक्षिप्त चाळे करताना आढळली. याप्रकरणी तीन जोडप्यांसह कॅफे सेंटर चालविणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११० नुसार कारवाई करण्यात आली.

याविषयी वाळूज एमआयडीसी पोलीसांना अनेक संघटनांनी निवेदने दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलिस उपनिरीक्षक स्वाती उचित, पोलिस नाईक संदीप गाडगे, संजय पवार, प्रशांत सोनवणे, महिला पोलीस अंमलदार प्रियंका तळवंदे आदींच्या पथकाने शनिवारी वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी कॉफी कॅफेंवर छापे टाकले.

यात महाराणा प्रताप चौकातील कॅफे मार्क ३० व कॅफे डार्क लाईट या दोन ठिकाणी तीन जोडपी विक्षिप्त चाळे करताना आढळले. याप्रकरणी तीन जोडप्यांसह डार्क लाईट कॅफे सेंटरचा मालक नचिकेत वाळू लिंबोटे, कॅफे मार्क ३०चा मालक शुभम गजानन कानेकर यांच्यावर कलम ११० महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पालकांनो...मुलांवर लक्ष असू द्या

गेल्या आठ ते दहा वर्षात वाळूज महानगर वेगाने प्रगती करीत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराप्रमाणेच येथेही कॅफे कल्चर वाढले आहे. शाळा, कॉलेजच्या बाजूला किंवा उच्चभ्रू वसाहतीच्या बाजूला प्रायव्हसी म्हणून अनेक कॉफी कॅफे कॉलेजच्या मुला, मुलींना खासगी कंपार्टमेंट किंवा काळी काच असलेली ठिकाणे उपलब्ध करून देतात. वर्दळीच्या ठिकाणी, चौकांत काही तरुण अभ्यासाच्या नावाखाली अमली पदार्थ सेवन करून नको ते चाळे करताना दिसून येतात. याची कुणकुण पालकांना नसते, असे नाही. पण काही पालक लाडाकोडाने वाढविलेल्या पाल्यांच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करतात. परंतु, यातून भविष्यात मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. म्हणूनच सूज्ञ पालकांनी पाल्यांवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे. त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण, शाळा-महाविद्यालयात मुले खरेच जातात का, बाहेर जात असतील तर नेमकी कुठे जातात, याविषयी पालकांनीच सजग राहण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT