Crime  sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पोलिस भरती परीक्षा; पोलिसासह दोघांना अटक

इलेक्ट्रिक यंत्रांचा वापर करून परीक्षार्थींना सांगितली उत्तरे

सकाळ वृत्तसेवा

इलेक्ट्रिक यंत्रांचा वापर करून परीक्षार्थींना सांगितली उत्तरे

औरंगाबाद : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर पोलिस दलातील पोलिस अंमलदारासह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा पद्धतीने तीन लेखी परीक्षेदरम्यान उत्तरे सांगितली असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

राहुल उत्तम गायकवाड (वय ३३, रा. मिलकॉर्नर, पोलिस वसाहत, औरंगाबाद) असे या अंमलदाराचे नाव आहे. त्याच्यासह गणेश रामभाऊ वैद्य (वय २५, रा. धोंदलगाव, वैजापूर, औरंगाबाद) याला देखील अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी नितीन जगन्नाथ मिसाळ (वय २६) आणि रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय २४, दोघेही रा. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक शशिकांत यशवंत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंजवडी परिसरातील ब्लूरीज पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून परीक्षा देण्याचा प्रयत्न करत असताना मिसाळ आणि शिंदे यांना पकडण्यात आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.

गायकवाड आणि वैद्य यांना मंगळवारी (ता. २१) न्यायालयात हजर करण्यात आले होते. गायकवाड याला कायद्याचे ज्ञान असतानाही त्याने हा गुन्हा केला आहे. तो याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना देण्याची शक्यता कमी आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र कुठून आणले याचा तपास करायचा आहे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणारे रॅकेट कार्यरत आहे का, याचा छडा लावण्यासाठी आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरासरी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गायकवाडच्या सासऱ्यांची ॲकॅडमी

गायकवाड याच्या सासऱ्यांची पोलिस भरतीची ॲकॅडमी आहे. त्या ॲकॅडमीमध्ये अशा पद्धतीने परिक्षा देण्याचे रॅकेट सुरू आहे का, तसेच त्याने नेमकी कोणाला उत्तरे सांगितली याचा पोलिस तपास करीत आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे तपास करीत आहेत.

"हिंजवडी (पुणे) पोलिसांनी औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली, हे खरे, मात्र त्याबद्दल आपल्याला सखोल माहिती नाही. ब्लू टूथ डिव्हाइसद्वारे चिटिंग केल्याच्या प्रकरणात तपास सुरू आहे, त्यामध्ये या पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली इतकी माहिती आपल्याला सांगण्यात आली आहे."

- डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Crime : माजी महिला सरपंचासह सासऱ्यांना घरात घुसून मारलं; इचलकरंजीलगत असलेल्या गावात धक्कादायक घटना, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

India Farmer IDs: देशात ११ हजार किसान पहचान पत्रांचे वाटप; मुदतीच्या पाच महिने आधी उद्दिष्ट पूर्ण

रितेश आणि जिनिलिया देशमुख सहकुटुंब अजमेर शरीफ दर्ग्यावर; चादर, फुलंही चढवली; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी चकीत

'Vivo Y600' लवकरच होतोय लाँच! 10,000mAh बॅटरी अन् 50 MP कॅमेरा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फोनच्या नावाची नोंद...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

SCROLL FOR NEXT