Police Violence News esakal
छत्रपती संभाजीनगर

मुलाला पोलिस नेत असल्याचा धक्का बसून वडिलाचा हृदयविकाराने मृत्यू

पोलिसांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शेख शब्बीरभाई यांच्यावर शोकाकूल वातावरणात दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : अचानक ! पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी (Paithan MIDC) मोटारसायकल व पाणबुडी विद्युतपंप चोरी प्रकरणी एका आरोपी युवकाला उचलल्याचा प्रकार बघून घाबरलेल्या वडीलाचा धक्क्याने जागेवरच मरण पावल्याची घटना बुधवार (ता.आठ) पहाटे तारूपिंपळवाडी (ता.पैठण) (Paithan) येथे घडली आहे. दोषी पोलिसांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस आधिकाऱ्यांनी दिल्यावर पोलिस बंदोबस्तात दुपारी शोकाकूल (Aurangabad) वातावरणात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या पथकाने बुधवारी पहाटे दोन वाजता तारूपिपंळवाडी येथील शेख शब्बीरभाई शेख इब्राहीम (वय ६०) हे घरी झोपलेले असताना त्यांना उठवत एकदम दरडावून कोठे आहे? तुमचा मुलगा असे बोलून आरोपी मुलगा शेख बिलाला शोधत घरातून त्याला उचलले. (Police Violence)

वडील शब्बीरभाई शेख यांना प्रचंड धक्का बसल्याने जागेवर हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडला.

हा प्रकार बघून वडील शब्बीरभाई शेख यांना प्रचंड धक्का बसल्याने जागेवर हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडला. त्यानंतर गावातील लोकांनी तात्काळ बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सकाळी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करत जोपर्यंत संबंधित पोलिस आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यांत घेणार नाही असा संतप्त पवित्रा नातेवाईकानी पैठण उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ.विशाल नेहूल यांच्याकडे घेतल्याने वातावरणात तापले होते. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी उपस्थित होता. अखेर शवविच्छेदनानंतर उपविभागीय अधिकारी नेहूल यांनी पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर दुपारी उशीरा शेख शब्बीरभाई याच्यावर शोकाकूल वातावरणात दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी बिडकीन पोलिस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, फौजदार दिलीप चौरे, फौजदार छोटू गिराशे आदी उपस्थित होते. दरम्यान पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याअंतर्गत गावात अवैध धंदे खुले आम चालू आहे. याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याची चर्चा या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT