अल्पवयीन मुल 
छत्रपती संभाजीनगर

रागाच्या भरात गेलेल्या मुलाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधले

सुषेन जाधव

औरंगाबाद : आई रागावल्याचा राग मनात धरुन घर सोडून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा मुकूंदवाडी पोलिसांनी (Crime) अवघ्या दोन तासात शोध घेऊन आईवडिलांच्या हवाली केले. विशेष म्हणजे मुकूंदवाडी पोलिसांकडे पालकांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांचे एक पथक तत्काळ कामास लागले. अन् तांत्रिक पद्धतीने शोध घेत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित मुलास राजनगर रेल्वेपटरी परिसरातून (Aurangabad) निघून गेलेल्या मुलास ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी शोध पथकप्रमुख तथा उपनिरीक्षक अमोल टी. म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकूंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलनगर, प्रकाशनगर परिसरात सूर्यकांत जैस्वाल (नाव बदललेले आहे) राहतात. त्यांचा १२ वर्षीय मुलगा तेजस्वीकुमार (नाव बदललेले आहे) याला त्याची आई काही कारणावरून रागावली होती. याचा राग मनात धरुन तेजस्वीकुमारने रविवारी (ता.२९) सकाळी नऊ वाजेदरम्यान कोणालाही काही कळू न देता घर सोडले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याचा सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुटुंबीय शोध घेत होते.

मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही न सापडल्याने आईवडिलांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज पगारे, निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह कर्मचाऱ्यांना शोध घेण्याच्या सूचना करताच पथकप्रमुख म्हस्के तातडीने कामाला लागले. सेफ सिटी कॅमेऱ्याच्या माध्यमातून माग काढत म्हस्के यांनी अवघ्या तासात म्हणजे सात वाजता तेजस्वीकुमारचा शोध घेतला. त्याला आईवडिलांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह उपनिरीक्षक सुनील चव्हाण, उपनिरीक्षक संदीप वाघ, अंमलदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील, श्याम आढे, विनोद बनकर, गणेश वाघ यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT