Poster By Shivsena Sakal
छत्रपती संभाजीनगर

शेंडी-जानव्याला आडवे करू"; मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी सेनेचं पोस्टर वादात

ज्यादा द्याल 'ताण', तर उलटा घुसेल बाण, असाही उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जोरदार पोस्टरबाजीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगत आहे. (CM Uddhav Thackeray Aurangabad Rally)

या पोस्टरवरुन थेट भाजपावर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. ईडी, आर्थिक कोंडी, बदनामी करून उद्धव ठाकरे सरकारला घेराल तर गाठ शिवशक्ती-भिमशक्तीशी आहे, असंही या पोस्टरमध्ये म्हटलंय. तसंच भाजपावर जोरदार टीका करत असताना त्यांनी संविधान, देश वाचवण्यासाठी सर्व दलित, वंचितांनी, नेत्यांनी ठाकरे सरकारला बळ द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. इम्तियाज जलिल आणि किरीट सोमय्यांची सध्या युती झालीये, असा आरोपही त्यांनी केला आहे.

केतकी चितळेसारख्या (Ketaki Chitale) विकृती भारतीय संस्कृतीला काळिमा फासत असल्याची टीकाही या पोस्टरमधून करण्यात आली आहे. शिवशक्ती -भीमशक्तीचा एकच नारा - शेंडी-जानव्याला हद्दपार करू, ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू. आमचे हिंदुत्व बहुजनांचे आहे, दीड टक्क्यांचे, शेंडी-जानव्याचे नाही, असंही या पोस्टरवर म्हटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

Amravati: शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर; चौकशीचा अहवाल एटीसींकडे : गृहपालाच्या अडचणीत वाढ

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT