छत्रपती संभाजीनगर

‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचा स्तंभपूजन

CD
(ABD26J81195) बीड बायपास ः परिसरातील जाबिंदा मैदानावर ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचे स्तंभपूजन करताना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे, मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर. --- ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याचे स्तंभपूजन जाबिंदा मैदानावर देवेंद्र सेवा महोत्सवाचा उपक्रम बीड बायपास, ता. १३ ः देवेंद्र सेवा महोत्सवाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे स्तंभपूजन रविवारी (ता. ११) जाबिंदा मैदान, बीड बायपास येथे झाले. हा महानाट्य कार्यक्रम सोमवार (ता. २६) ते रविवार (ता. एक) दररोज सायंकाळी सहा ते दहा होणार आहे. या सोहळ्यास देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाट, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी आमदार संजय केणेकर, भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे, बापू घडामोडे, राजू शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास, स्वराज्याची स्थापना, मावळ्यांचे शौर्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने या महानाट्याचे आयोजन केले आहे. सदरील कार्यक्रम हा मोफत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT