आरोग्यमंत्री आबिटकर १ व २ नोव्हेंबरला जिल्हा दौऱ्यावर
-----
नांदेड, ता. ३१ : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे १ व २ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांची पाहणी करणार असून, आरोग्य समित्यांच्या बैठका घेणार आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी (ता. एक) सकाळी ९ वाजता हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी आणि रुग्णकल्याण समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील. सकाळी ११ः३० वाजता नांदेड येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. दुपारी १ ते ५ या वेळेत वाडी बुद्रुक (पावडेवाडी) येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयासह अन्य विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील. सायंकाळी नांदेड शहरातील विविध आरोग्य संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. रात्री शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी (ता. २) सकाळी ७.३० वाजता ते नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे प्रयाण करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.