Prakash Ambedkar visit to Aurangzeb tomb in Khuldabad says Aurangzeb rule of 50 years cannot be erased  
छत्रपती संभाजीनगर

Aurangzeb : 'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

रोहित कणसे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वेगवेगळ्या शहरात मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकावल्यामुळे तसचे सोशल मीडियावर स्टेटस आणि पोस्ट ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुल्ताबाद शहरातील औरंगजेबाच्या कबरीला आज, १७ जून रोजी भेट दिली. या भेटीनंतर आंबेडकरांनी पतिक्रियादेताना औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं हे कोणला मिटवता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर, नामांतरावरून सुरू असलेल्या वादवार आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इथं भद्रा मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीच्या मंदिराने देखील आम्हाला मदत केली आहे. त्यांना कसलाही आक्षेप नाहीये, त्यालाही मी असंच संध्याकाळी भेट देतो आहे.

भारताच्या दृष्टीकोनातून खुल्ताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. याचा लोकांनी विचार करावा. नावावरून जो भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे त्यांना एवढंच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकीय चर्चांना उधाण

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे,यावरून काही दिवसांपासू दोन्ही पक्षात चर्चा देखील सुरू आहे. यादरम्यान आता आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याने राजकीय वर्तुळात भोवया उंचावल्या आहेत. या भेटीवर राजकीय स्तरातून काय प्रतिक्रिया उमटणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT