पाणी, चाऱ्याचे योग्य नियोजन करा
-
आमदार बंब यांनी घेतला गंगापूर, खुलताबादमधील स्थितीचा आढावा
गंगापूर, ता. ६ (बातमीदार) : गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने पाणी, चारा आणि रोजगाराचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आमदार प्रशांत बंब यांनी दिले. येथील शिवकृपा मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. पाच) त्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारणाची विशेष आढावा बैठक पार पडली.
बैठकीत पाणीटंचाई, पीक नुकसान, अनुदान वाटप, रोहयो आणि वीज वितरण कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. टँकरचे प्रस्ताव तयार करताना वास्तविक निकष लावून प्रतिव्यक्ती २० लिटर आणि प्रत्येक जनावरासाठी प्रतिदिन ३५ लिटर पाण्याचा हिशोब धरण्याच्या सूचना आ. बंब यांनी दिल्या. ग्रामपंचायतींनी लोकसंख्या व उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेऊन तत्काळ परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे सांगण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा लागवडीकरिता शेती महामंडळाची जमीन व पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गोदावरी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी; प्रशासनामार्फत बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, तसेच पिकवलेला चारा योग्य दरात खरेदी करण्यासाठी शासन रीतसर करार करेल, अशी ग्वाही देण्यात आली.
बैठकीस नगराध्यक्ष संजय जाधव, कारखाना चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर, जि. प. समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, पं. स. सभापती कविता चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.