Prashant Bamb Sakal
छत्रपती संभाजीनगर

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांचा एल्गार; वाचा प्रकरण

दत्ता लवांडे

औरंगाबाद : "शिक्षक गावातील मुख्यालयात राहत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तर शिक्षक मुख्यालयात न राहता निवासासाठी देण्यात येणारा भत्ता उचलतात" असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी विधीमंडलाच्या अधिवेशनात केला होता. त्यामुळे शिक्षक वर्ग संतप्त झाला असून आज औरंगाबादमध्ये आमदार बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला आहे. शहरातील आमखास मैदानावरून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार असून शिक्षकांकडून निवेदन देण्यात येणार आहे.

(Teachers Protest Against MLA Prashant Bamb)

शिक्षकांना सरकारचे अनेक कामे करावे लागतात. त्यामध्ये निवडणुकीचे कामं असतील, मतदार नोंदणीचे काम असेल किंवा जनगणनेचे काम असेल असे जवळपास दीडशे काम शिक्षकांना करावे लागतात आणि एखादा लोकप्रतिनिधी शिक्षकांना धारेवर धरतो हे योग्य नाही असं मत आंदोलनाला आलेल्या शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे आणि आमदार सतिश चव्हाण हे करत आहेत. शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि त्यांना समाजात चांगला मान मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभा अधिवेशनात शिक्षक मुख्यालयात राहत नसल्यामुळे मुलांमधील गुणवत्ता कमी झाली असा आरोप केला होता. त्याचबरोबर शिक्षक मुख्यालयात राहत नसतानाही भत्ता घेतात असा आरोप करत त्यांना देण्यात येणारा भत्ता कपात करण्यात यावा अशी मागणी बंब यांनी केली होती. त्यानंतर काही शिक्षकांनी त्यांना फोन करून जाब विचारला आणि या प्रकरणाचे रूपांतर वादात झाले आणि आता शिक्षकांनी बंब यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT