छत्रपती संभाजीनगर

प्रीमियम फळपिकांच्या लागवडीचे तंत्र शिकविणारी कार्यशाळा

CD
((((मराठवाडा आवृत्तीसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी))))) --- प्रीमियम फळपिकांच्या लागवडीचे तंत्र शिकविणारी कार्यशाळा --- छत्रपती संभाजीनगर येथे २७ सप्टेंबरला मार्गदर्शन --- छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ड्रॅगनफ्रूट, अ‍ॅव्होकॅडो, स्ट्रॉबेरी आणि बेरीज यासारख्या प्रीमियम फळपिकांना बाजारपेठेत वाढती मागणी असून, या पिकांमधून शेतीला अधिक उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. या फळपिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि बाजारपेठेचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करणारी विशेष ‘प्रीमियम पिकांची ओळख व लागवड प्रशिक्षण’ कार्यशाळा रविवार, २७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या कार्यशाळेत आपल्या शेतासाठी योग्य पीक निवडण्यापासून सुरवात करून जमीन आणि हवामानाची निवड, विविध जातींची निवड, लागवडीचे तंत्र, सिंचन व खत व्यवस्थापन, छाटणी, रोग-कीड नियंत्रण आणि उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय काढणी, ग्रेडिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे. याशिवाय या पिकांचे उत्पादन खर्च, उत्पन्नाचे गणित, विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठा, मूल्यवर्धन आणि प्रभावी विक्री धोरण यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नवीन फळपिकांची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पीक निवडीपासून विक्रीपर्यंतचे नियोजन समजून घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत प्रीमियम फळपिकांच्या संधींचाही अभ्यास करून योग्य नियोजन करावे, या उद्देशाने आयोजित ही कार्यशाळा कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ---- प्रशिक्षणामध्ये काय शिकाल ? -जमीन, हवामान व वाण निवड -सिंचन व खत व्यवस्थापन -रोग व कीड नियंत्रण -काढणी, ग्रेडिंग व साठवण -विक्री व मूल्यवर्धन -खर्च-नफा नियोजन ---------------------------------------------------- अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ८४८४८११५४४. कार्यशाळेचे ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, प्लॉट नं. ७, एन-१, सिडको टाऊन सेंटर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर ---------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT