1GHATI_HOSPITAL 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या घाटीत दाखल कैदी गेला पळून, पोलिसांचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर

सुषेन जाधव

औरंगाबाद : पोटात गाठ आल्याच्या तसेच मूत्रपिंडच्या आजारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका कैद्याने पळ काढल्याची घटना शनिवारी (ता.५) सकाळी पावणे नऊच्या सुमारास समोर आली आहे. किशोर विलास आव्हाड (रा.मुकुंदवाडी) असे कैद्याचे नाव आहे. पोलिसांची सतर्कतेचा कसा बोजवारा उडाल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.या प्रकरणी कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कैदी किशोर आव्हाड याच्यावर जवाहरनागर आणि छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला मुलीवरील अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये चार वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आव्हाड याला दोन प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


पोलिसांची पथके मागावर
घाटीतून पळ काढल्यानंतर त्याच्या नाकेबंदी करण्यात येऊन त्याच्या मागावर पोलिसांची पथके पाठवण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांनी दिली. कैदी आव्हाड याने १४ दिवस घाटीत उपचार घेतल्यानंतर पुन्हा कारागृहात दाखल केले होते. पुन्हा पोटात गाठ आल्याने तसेच मुत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने त्याला पहाटे घाटीत हलविण्यात आले होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास तो घाटीतून पसार झाल्याचे समोर आले.

काय होते प्रकरण
आत्याच्या घरी रात्री साडेनऊच्या सुमारास मैदानातून पायी निघालेल्या १४ वर्षीय मुलीचा हात पकडून तिला जबरदस्ती दुचाकीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान मुलीने आरडाओरड केल्याने तिच्या आवाजाने परिसरातील एक महिला घटनास्थळी धावल्याने तिला पाहून किशोरने धूम ठोकली होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर या प्रकरणात भांदवि ३५४ व पोक्सो कायद्याच्या ८ कलमान्वये आव्हाडला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मुलीवरील अत्याचाराच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये चार वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT