छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या गर्दीत खासगी ट्रॅव्हल्सची लूट खपवून घेणार नाही, अवाजवी भाडे आकारणाऱ्या बसवर कारवाई करा

CD
NND26B03913 राजेश पवार ----- ‘आरटीओ’ला ४८ तासांत तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश ------ सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २४ : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांकडून अवाजवी तिकीट दर आकारून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याबाबत दैनिक सकाळने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या ‘सणासुदीला प्रवाशांची लूट’ या बातमीची दखल घेत आमदार राजेश पवार यांनी खासगी बसचालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. प्रवाशांकडून नियमित दरांपेक्षा कित्येक पटीने अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन आयुक्तांकडे केली. तसेच नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देऊन ४८ तासांत विशेष तपासणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. खासगी बसचे तिकीट दर, वाहनांचे परवाने, अधिकृत थांबे, प्रवासी क्षमता, चालकांची पात्रता आणि वाहनांची तंदुरुस्ती यांची सखोल तपासणी करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये भरले जातात का, तसेच नियमबाह्य अतिरिक्त आसनव्यवस्था केली जाते का, याचीही पडताळणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्या संकेतस्थळांसह ट्रॅव्हल्स एजन्सींची तपासणी करून नियमित दिवसांतील आणि सणासुदीतील तिकीट दरांची तुलना करावी. नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच प्रवाशांकडून वसूल केलेले अतिरिक्त भाडे परत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ----- राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवावी नांदेड जिल्ह्यातील खासगी प्रवासी बसची संख्या, त्यांना मंजूर असलेले मार्ग आणि अधिकृत थांबे यांची माहिती संकलित करण्याची मागणी आमदार पवार यांनी केली आहे. तपासणी केलेल्या बसची संख्या, आढळलेले नियमभंग, आकारण्यात आलेला दंड आणि परवान्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील ४८ तासांत सादर करावा, असे त्यांनी आरटीओ प्रशासनाला कळविले आहे. प्रवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे. ---- ((कोट))) दिवाळीला कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अवाजवी पैसे वसूल करणे स्वीकारार्ह नाही. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक आणि त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. -राजेश पवार, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT