number of seats are decreased for SC SC NT students for Engineering in Nagpur
number of seats are decreased for SC SC NT students for Engineering in Nagpur  
छत्रपती संभाजीनगर

खासगी शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

संदीप लांडगे

गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होते. यंदा देखील जुलै महिन्यात मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने आणखी काही काळ शाळा बंद राहण्याचे संकेत आहेत.

औरंगाबाद : शाळा (School) सुरु होण्याबाबत अनिश्‍चितता असली तरी, शहरातील खासगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्य शाळांमध्ये प्रवेशाकरिता स्पर्धा सुरु झाली आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना व्हॉट्सॲप मॅसेजेस किंवा फोन करून संपर्क साधला जात आहे. तसेच काही शाळांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गल्लीबोळात फिरून विद्यार्थी शोधण्याच्या कामाला लावले आहेत. औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) हद्दीत जवळपास साडेचारशेच्या आसपास खासगी शाळा (Private Schools) आहेत. या खासगी व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्यात जाहीर होताच पुढील शैक्षणिक वर्षाची (Academic Year) प्रवेश प्रक्रिया सुरु होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा (School), महाविद्यालये (College) बंद होते. यंदा देखील जुलै महिन्यात मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने आणखी काही काळ शाळा बंद राहण्याचे संकेत आहेत. त्यासाठी काही शाळांनी या समस्येवर उपाय म्हणून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. अनेक शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ओळखीच्या पालकांना फोन करून आपली शाळा यंदा विद्यार्थ्यांना (Student) कसे शिकवणार, इतर संस्थांपेक्षा आपली संस्था किती चांगली आहे, हे पटवून देत आहेत. (Private Schools Online Admission Open In Aurangabad)

लॉकडाऊनमध्ये शिक्षक गल्लीबोळात

काही खासगी शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऐन उन्हात शहरातील कॉलनी, गल्लीबोळात विद्यार्थी शोधायला लावले आहे. त्यामुळे शिक्षकही आपली नोकरी टिकवण्यासाठी गल्लीबोळात विद्यार्थ्यांची माहिती घेत आहेत. तसेच पालकांना आपल्या शाळेचे पत्रक देऊन मुलांना शाळेत टाकण्याचा आग्रह करतात. दररोज हे शिक्षक १५ ते २० घरांचे उंबरे झिजवत आहेत. यात लॉकडाऊनचा फज्जा उडालेला दिसत आहे.

यंदा शैक्षणिक शुल्कात कपात

अनेक शाळा, संस्थांनी मागील वर्षी प्रवेशासाठी संपर्क केलेल्या पालकांना फोन करून पाल्याला आपल्याच शाळेत प्रवेशाची गळ घातली जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी डोनेशनची मोठी रक्कम मागणाऱ्या बहुतांश शाळा यंदा केवळ शैक्षणिक शुल्कात प्रवेश देण्यास तयार होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT