छत्रपती संभाजीनगर

रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवा ः वडवळे

CD
NND26B02844 नांदेड ः रेशीम दिनानिमित्त सायाळ येथे प्रगतिशील रेशीम उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. --- रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवा ः वडवळे नांदेड : पारंपरिक शेतीतील अनिश्चिततेवर मात करून शाश्वत व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केले. रेशीम दिनानिमित्त जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने सायाळ (ता.लोहा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रगतिशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दहा दिवसीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन झाले. वडवळे म्हणाले की, लोहा तालुक्यातील अनेक प्रगतिशील शेतकरी रेशीम शेतीतून एकरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. कमी पावसामुळे पारंपरिक पिकांवर परिणाम होत असल्याने रेशीम शेती हा फायदेशीर पर्याय ठरू शकतो. कार्यक्रमास एसबीआय-आरसेटीचे संचालक कैलास जायभाये, आशिष राऊत, कांचन जाधव, अभय कुलकर्णी, प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे आदी उपस्थित होते. माधव जायभाये, भारत राऊत, लक्ष्मण दळवे, किरण शिखरे, गंगाधर पावडे, कल्याण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

SCROLL FOR NEXT