Ajantha leni Sakal
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा-वेरूळ लेणीवर नाईट टुरिझमला चालना द्या

एटीडीएफची पर्यटन मंत्रालयाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथे नाईट टुरिझम सुरु करीत तेथील पर्यटनाला चालना देण्यात यावीत अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास प्रतिष्ठानतर्फे (एटीडीएफ) पर्यटनमंत्री, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी बुधवारी (ता.२०) दिली. जागतिक वारसा दिनानिमित्ताने १८ एप्रिल रोजी कैलास लेणीच्या समोरील हिरवाळीवर ''त्रिकाल'' हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत लेणी विद्यृत रोषणाईसह पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. याला मोठा प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतीक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी देशातील १० वारसास्थळे रात्री ९ पर्यंत पर्यटकांसाठी खुली ठेवण्याचे जाहिर केले. यात महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालूक्यातील मार्कंडा देवस्थानाचा समावेश आहे. मध्यतंरी बिबिका मकबरा हे रात्री नऊ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. त्यावेळी पर्यटकांना याचा लाभ झाला. वाढत्या तापमानाचाही परिणाम पर्यटकांवर होत आहे. यामुळे याच धरतीवर आता वेरुळ लेणी सायंकाळी सात ते रात्री ११ पर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT