छत्रपती संभाजीनगर

अभ‍िलेख अद्ययावत न करता दस्त नोंदणी केल्यास होणार कायदेशीर कारवाई

CD
अभ‍िलेख अद्ययावत न करता दस्त नोंदणी केल्यास कारवाई ----------- हिंगोली, ता. ५ : महसुली अभिलेख अद्ययावत करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सह निबंधकांना केल्या आहेत. नियमाला बगल दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. मंजूर विकास योजना व प्रादेशिक योजनेतील जमिनीवर मंजूर लेआऊटनुसार भूखंडांची खरेदी- विक्री करताना, प्रत्येक भूखंडाला कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा उपक्रमांक किंवा प्रॉपर्टी कार्ड (पीआर कार्ड) मिळाल्यानंतरच त्या भूखंडाची दस्त नोंदणी करावी. तोपर्यंत वैयक्तिक भूखंडांच्या खरेदी- विक्री व्यवहारांची नोंदणी करू नये. खरेदी खतासोबत सक्षम प्राध‍िकरणाने मंजूर केलेल्या लेआऊटमधील त्या विश‍िष्ट प्लॉटचा चौहद्दीसह नकाशा, कमी जास्त पत्रकानुसारचा नकाशा, अद्ययावत सातबारा जोडणे कायदेशीररित्या सक्तीचे करावे. मंजूर लेआऊटमधील रस्ते, मोकळी जागा, सुविधा क्षेत्रे उपक्रमांकनिहाय सातबाऱ्यामध्ये प्रतिबंधित मालमत्ता म्हणून नोंदविणे गरजेचे आहे. विविध वापराच्या प्रयोजनासाठी मंजुरी दिलेल्या लेआऊटमधील भूखंडाच्या खरेदी- विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी कमी-जास्त पत्रकानुसार अद्ययावत केलेल्या सातबारानुसार असल्यास करावी. मंजूर लेआऊटची कमी जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा, पीआर कार्ड तयार नाही, अशा भूखंडाचे अभ‍िलेख अद्यावत केल्यानंतरच दस्त नोंदणी करावी, अशा सूचनाही जिल्हा निबंधकांना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Ajit Jogi IAS to Chief Minister : राजीव गांधींच्या एका फोन कॉलवर IAS नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणारे अजित जोगी पुढे कसे बनले काँग्रेसचे सर्वात मोठे बंडखोर?

नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

SCROLL FOR NEXT