छत्रपती संभाजीनगर

मालमत्ता पुनर्रसर्वेक्षणासाठी तीन एजन्सींचा प्रतिसाद

CD
मालमत्ता पुनःसर्वेक्षणासाठी तीन एजन्सींचा प्रतिसाद -- ऑर्नेट, पोर आणि स्थापत्य एजन्सीच्या निविदांचे टेक्निकल बीड उघडले -- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १९ : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. दुसऱ्यांदा मागविलेल्या निविदा प्रक्रियेत ऑर्नेट, पोर आणि स्थापत्य या तीन एजन्सींनी प्रतिसाद दिला आहे. महापालिकेने या निविदांचे ‘टेक्निकल बीड’ (तांत्रिक लिफाफे) उघडले असून, कागदपत्रे व तांत्रिक बाबींची तपासणी सध्या सुरू आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी नियमानुसार दर पाच वर्षांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असले, तरी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने वर्षानुवर्षे पुनर्मूल्यांकन केलेले नाही. त्यामुळे शहरात मालमत्ता किती? याचे वेगवेगळे आकडे वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व मालमत्तांचे फेरसर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २ सप्टेंबरला निविदा प्रसिद्ध केली होती. जुलै महिन्यातील सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी अंतिम होणाऱ्या एजन्सीला १८ महिन्यांत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावे लागणार असून, त्यानंतर पुढील ५ वर्षे संबंधित मालमत्तांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे, यासह विविध अटी निविदेत आहेत. पहिल्यांदा महापालिकेच्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. दुसऱ्यांदा मागविण्यात आलेल्या निविदांना ऑर्नेट, पोर आणि स्थापत्य या तीन एजन्सींनी प्रतिसाद दिला आहे. नियमानुसार तीन एजन्सींचा प्रतिसाद मिळणे गरजेचे असल्याने प्रशासनाने निविदेची पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. या तीन एजन्सींच्या तांत्रिक पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ‘फायनान्शियल बीड’ उघडून कंत्राट अंतिम केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. --- ४० कोटींचा होणार खर्च खासगी एजन्सीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणासाठी किमान ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च भागवण्यासाठी महापालिका जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करणार आहे. १८ महिन्यांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT