छत्रपती संभाजीनगर

शास्तीमाफी कायम, तरीही कर थकबाकी

CD
मेन --- शास्तीमाफी कायम, तरीही कर थकबाकी --- मनपाच्या अभय योजनेस मुदतवाढ; तरी करधारकांची पाठ --- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १८ ः महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर व पाणी कर भरणाऱ्यांसाठी १०० टक्के शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू केली असून, या योजनेला १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन थकबाकीदारांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची व पाणी कराच्या थकबाकीचा डोंगर वर्षानुवर्षांपासून वाढतच आहे. दरवर्षी महानगरपालिका जवळपास तीन ते चार महिने अभय योजना राबविते. त्यामुळे मालमत्ता व पाणी करावरील प्रतिमहा दोन टक्के लावली जाणारी शास्ती १०० टक्के माफ करण्यात येते. परंतु, तरीदेखील थकबाकीदारांवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. पालिका अतिशय सौम्य पद्धतीने थकबाकीदारांकडून कराची मुद्दलच मागते. त्यावरील शास्ती, दंड मागतच नाही. तसेच जप्तीच्या नोटिसा देण्याव्यतिरिक्त कठोर कारवाई करीत नाही. बड्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे, त्यांच्या घरासमोर जाऊन बँड वाजवणे, चौकाचौकांत थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावणे असे काहीही करीत नाही. तरीसुद्धा थकबाकीदार कर भरत नसल्याने पालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. ---- अभय योजनेस मुदतवाढ कराच्या वसुलीसाठी आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वेच्छा अधिकारानुसार शास्ती १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रात १४ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना थकबाकीवरील विलंबशास्तीत १०० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली होती. या कालावधीत वसुलीसाठी मालमत्ताधारकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने अभय योजनेस मुदतवाढ देण्यात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान थकीत व चालू मालमत्ता, पाणी कर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे. ----- कोट्यवधींचा कर थकला महानगरपालिकेचा शास्ती वगळता जवळपास १४० कोटी रुपये मालमत्ता कराचे, तर ४० कोटी रुपये पाणी कराचे थकले आहेत. त्यातील निम्मा कर हा शासकीय कार्यालयांकडे थकला असून, ही कार्यालये दरवर्षी पालिकेच्या पथकांची रिकाम्या हाताने बोळवण करीत आहेत. उर्वरित निम्मा कर शहरातील मालमत्ताधारकांकडे थकला आहे. त्यातील ठरावीक थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. --- शासनकर्त्यांचे हवे पाठबळ कोट्यवधींचा कर थकल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तर गंभीर झालाच आहे; परंतु अन्य सुविधा निर्मितीवरदेखील परिणाम झाला आहे. थकबाकीच्या वसुलीत अनेक लोकसेवकांचा अडसर येत असल्याने तसेच काही अधिकारी, कर्मचारीदेखील बाधा आणत असल्याने त्याचा वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता महापौर, उपमहापौर, सर्व गटनेते, सभागृह नेते, स्थायी समितीसह सर्व सभापतींनी आयुक्तांना पाठबळ देऊन वसुली लिपिकांकडून कराची वसुली सुरू केली, तर त्यास मोठा प्रतिसाद मिळेल. कुणाचीही गय न करता पालिकेने चार-दोन बड्या थकबारीदारांना हिसका दाखविला, तर करवसुलीचे प्रमाण वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : शायना एनसीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबई प्रेस क्लब बाहेर निदर्शनं

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT