Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत देहविक्री; दांपत्यासह महिलेवर गुन्हा दाखल

चिकलठाणा परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - चौदा वर्षीय मुलगी आणि तिच्या भावजयीला ब्युटीपार्लरचे काम देण्याची थाप मारत बोलावून घेत त्यांना रो हाउसमध्ये डांबून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेण्यात आला. २४ एप्रिल ते २५ मे दरम्यान जालना रोडवरील हिरापूर शिवारात विविध हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी एका दांपत्यासह महिलेविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या भावजयीने तक्रार दाखल केली आहे. ही मुलगी सिटीचौक पोलिस ठाणे हद्दीत राहते. २४ एप्रिलला या दोघींना मुन्नासेठ, त्याची पत्नी रोजा आणि सीमा नावाच्या महिलेने बोलावले होते. ब्युटीपार्लरचे काम मिळवून देते, असे आमिष या दोघींना संशयितांनी दाखविले होते.

या दोघी भेटायला गेल्यानंतर त्यांना हिरापूर शिवारातील औरा इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला असलेल्या रो हाउसमध्ये डांबून ठेवण्यात आले. यानंतर संशयित आरोपींनी २८ एप्रिल ते २५ मे दरम्यान तक्रारदार महिलेची अल्पवयीन नणंदेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या दोघींची सुटका झाल्यानंतर तक्रारदार महिलेने पीडित मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले.

तिच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याची सुरवात चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत झाल्याने सिटीचौक पोलिसांनी हा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग केला. मुन्नासेठ, त्याची पत्नी रोजा आणि सीमा नावाच्या आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election : बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'

Police Body Camera: आता फक्त कॅमेराधारित पोलीसच चालान कापू शकतील; राज्यात नवा नियम लागू, कारवाई अधिक कठोर

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला

Pune Ahilyanagar Highway : कासारी फाटा येथे भीषण अपघात; नशेत असलेल्या चालकाने कंटेनर घुसवल्याने महिला ठार; तिघेजण जखमी!

तिथे मला नवऱ्याची खूप उणीव भासते... नीना कुळकर्णी यांनी सांगितली वैयक्तिक आयुष्यातली ती गोष्ट; म्हणाल्या- आम्ही दोघे...

SCROLL FOR NEXT