छत्रपती संभाजीनगर

बालहक्कांच्या संरक्षणासाठी १२ शाळांमध्ये जनजागृती

CD
बालहक्कांच्या संरक्षणासाठी १२ शाळांमध्ये जनजागृती बालविवाह प्रतिबंध, मुलींचे शिक्षण आणि हेल्पलाइनबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ------------ धाराशिव, ता. ६ (बातमीदार) : बालकांचे हक्क सुरक्षित राहावेत, त्यांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच संकटात सापडलेल्या बालकांना वेळीच मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाइन कक्ष १०९८ च्या वतीने विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बालहक्क, बालविवाह प्रतिबंध, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, बालकांसाठी राबविणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक व्ही. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत धाराशिव येथील नगरपालिका शाळा क्रमांक १९, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर, जीवनराव गोरे विद्यालय, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, भूम येथील सौ. राणीतारा प्रशाला, गुरुदेव विद्यालय, रवींद्र विद्यालय, येडशी पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावसूद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगोली आणि सरस्वती प्रायमरी स्कूल, शिंगोली अशा एकूण १२ शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली. बालकांवर होणारा अन्याय, अत्याचार, बालविवाह किंवा अन्य संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधता येतो. संकटात सापडलेल्या बालकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी या हेल्पलाइनची माहिती प्रत्येक बालकापर्यंत पोचणे आवश्यक आहे. यावेळी समुपदेशक वंदना कांबळे, पर्यवेक्षक अमर भोसले, पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना हेल्पलाइनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT