छत्रपती संभाजीनगर

''पी.यू. जैन''तर्फे आंतरशालेय प्रश्नमंजुषा ९ व १० ऑक्टोबरला

CD
‘पी.यू. जैन’तर्फे आंतरशालेय प्रश्नमंजूषा ९, १० ऑक्टोबरला ---- छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : पी.यू. जैन यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त राजाबाजार येथे जैन शिक्षण संस्थेच्या पी.यू. जैन माध्यमिक विद्यालयाने आंतरशालेय रौप्य महोत्सवी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून, शहर व ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. मनपा क्षेत्रातील शाळांसाठी ९ ऑक्टोबर तर ग्रामीण भागातील शाळांसाठी १० ऑक्टोबरला सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत बहुपर्यायी चाळणी परीक्षा होईल. इयत्ता आठवी ते दहावीतील दोन विद्यार्थ्यांचा एक संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. चाळणी परीक्षेत मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि सामान्यज्ञान या विषयांवरील प्रत्येकी दहा असे एकूण ६० प्रश्न विचारले जातील. यातून अंतिम १५ शाळांची निवड होईल. त्यानंतर पाच-पाच संघांच्या तीन गटांतून एकूण पाच संघ अंतिम फेरीसाठी निवडले जातील. अंतिम स्पर्धा ११ ऑक्टोबरला होणार असून, शहर विभागाची वेळ सकाळी ९.३० ते १२.३० तर ग्रामीण विभागाची दुपारी १ ते ३ अशी आहे. प्रश्नमंजुषेत वस्तुनिष्ठ, झटपट, बझर, दृक्-श्राव्य आणि संवाद अशा विविध फेऱ्यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सहभागाच्या माहितीसाठी विजय पाटोदी ८२७५२३८७७० यांच्याशी संपर्क साधावा. ---- विजेत्या संघाला ४१०१ रुपयांचे पारितोषिक विजेत्या संघाला ४१०१ रुपयांचे प्रथम पारितोषिक व फिरती ढाल तर द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३१०१ व २१०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT