accident accident
छत्रपती संभाजीनगर

पुणे - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कार चालक जागीच ठार

कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारात मंगळवारी (ता.29) सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली

जमील पठाण

कायगाव (औरंगाबाद): औरंगाबाद - पुणे राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादहुन नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिली आहे. यामुळे कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारात मंगळवारी (ता.29) सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली. अनिल एकनाथ महाजन असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर गावचे रहिवासी अनिल एकनाथ महाजन वय (31) वर्ष हे कार (क्रमांक. MH 01 BF,6297) घेऊन औरंगाबादहुन पुण्याकडे जात होते. औरंगाबाद - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारातून ते जात असताना त्यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने समोर चालणाऱ्या ट्रकला (क्रमांक MH.16 AY 1107) मागून त्यांच्या भरधाव कारने जोराची धडक दिली.

या दुर्दैवी रस्ता अपघातात कार चालक अनिल एकनाथ महाजन याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक यशवंत काकडे (रा. पारनेर जिल्हा अहमदनगर) यांना किरकोळ मार लागला. गंगापूर पोलिसांना रस्ता अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला घेत मृतदेह बाहेर काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी पाठवले.

शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रस्ता अपघात घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT