छत्रपती संभाजीनगर

पाण्याची उपलब्धता पाहून

CD
पाण्याची उपलब्धता पाहूनच रब्बी पेरणीचे नियोजन करा कृषी विद्यापीठाचा सल्ला; ज्वारी, करडई, सूर्यफूल आणि हरभऱ्याची योग्य निवड करण्याचे आवाहन ----- परभणी, ता. ३ (बातमीदार) : मराठवाड्यात यंदा अनेक भागांत कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन उपलब्ध पाण्यानुसार करण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने केले आहे. उपलब्ध पाण्याची खात्री करून रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल आणि हरभरा या पिकांची निवड करावी. बागायती क्षेत्रात पाणी उपलब्ध असल्यास ज्वारी, करडई आणि हरभऱ्याची पेरणी लवकर पूर्ण करावी, असा कृषी सल्ला विद्यापीठाने दिला आहे. कमी पावसामुळे आगामी काळात पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करून कडबा उत्पादनावर भर देणे आवश्यक आहे. पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी आणि करडई पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. ज्वारीतील काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३०० मेश गंधक चार ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पोंगेमर आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. बागायती करडईसाठी हेक्टरी ६० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद देण्याची शिफारस आहे. यापैकी ३० किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी, तर उर्वरित ३० किलो नत्र एक महिन्यानंतर द्यावे. हरभरा पेरणीपूर्वी मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा, तर मूळकूज रोगासाठी ट्रायकोडर्मा किंवा थायरमची बीजप्रक्रिया करावी. बागायती हरभऱ्यासाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. सूर्यफूल, ज्वारी, करडई आणि हरभरा या पिकांची निवड करताना जमिनीचा प्रकार, उपलब्ध पाणी आणि अपेक्षित उत्पादनाचा विचार करावा. पाण्याचा अपव्यय टाळून नियोजनबद्ध पेरणी करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. ----- १२ नोव्हेंबरपर्यंत पाऊस कमी राहण्याचा अंदाज ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरीएवढे ते किंचित जास्त, तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याचा अंदाज आहे. ६ ते १२ नोव्हेंबरदरम्यानही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Diwali 2026: दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा? जाणून घ्या वसुबारसचा अचूक मुहूर्त, गाय-वासराच्या पूजेचा विधी आणि महत्त्व!

Latest Marathi News Live Update : सुजय विखे यांनी दिल्या खासदार निलेश लंके यांना विजयाच्या शुभेच्छा

Gold-Silver Price Crash: धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! उच्चांकापासून सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

SCROLL FOR NEXT