छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ २२.५१ टक्के

CD
जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ २२.५१ टक्के ---- अपुऱ्या ओलाव्यामुळे पिकांची उगवण खुंटली; यंदा नापेर क्षेत्र वाढण्याची शक्यता --- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १९ ः जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी पेरणीचा वेग मंदावला असून, आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या केवळ २२.५१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, पेरणी झालेल्या क्षेत्रातही ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण व्यवस्थित झालेली नाही. पिकांची वाढही खुंटल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बीचे मोठे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्नधान्याची गरज व जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, तसेच कमी पाण्यात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांचा ज्वारी पेरणीकडे कल आहे. मात्र, जिल्ह्यात जिरायती क्षेत्राचे प्रमाण अधिक असल्याने पावसातील तूट रब्बी हंगामाच्या मुळावर आली आहे. मूग, उडीद तसेच लवकर परिपक्व झालेल्या सोयाबीनची काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची घाई केली. मात्र, पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या भागांतील भारी तसेच हलक्या व बरड जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बियाण्यांची उगवण अपेक्षेप्रमाणे झाली नाही. काही ठिकाणी उगवलेल्या पिकांची वाढही खुंटली आहे. परिणामी, जिरायती क्षेत्रातील मोठ्या भागात यंदा रब्बी पेरणी करणे अशक्य होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तसेच येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याद्वारे पूर्णा तालुक्यात सिंचनाची आवर्तने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सिंचनाच्या पाण्यामुळे या भागात पेरणी क्षेत्रात थोडीफार वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश जिरायती क्षेत्रावर दुष्काळाचे सावट कायम असल्याने यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. --- कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पेरणी जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ९६ हजार ७२ हेक्टर आहे. त्यापैकी शुक्रवार (ता. १३) पर्यंत ६६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीचे ८५ हजार ९७७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, प्रत्यक्षात २७ हजार १४७ हेक्टरवर (३१.५७ टक्के) पेरणी झाली आहे. गव्हाचे ३० हजार १९७ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना केवळ तीन हजार ९४७ हेक्टरवर पेरणी झाली. हरभऱ्याचे एक लाख २० हजार ७४१ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३५ हजार २३९ हेक्टरवर (२९ टक्के), तर करडईच्या एक हजार ४२८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९३५ हेक्टरवर (६५.५ टक्के) पेरणी झाली.

गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SA vs BAN 1st Test : १२ धावांचे लक्ष्य अन् दक्षिण आफ्रिकेचा ९ चेंडूंत विजय! WTC Final च्या शर्यतीत मोठी उलथापालथ, भारताच्या स्वप्नांना धक्का; समजून घ्या गणित

पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

SIP Investment: SIP मध्ये पैसा कमवायचा असेल तर किती वर्षे गुंतवणूक करावी? 7 वर्षांचा नियम काय? रीपोर्टमधून मोठा खुलासा!

शर्ट काढून विवाहित अभिनेत्रीला मारली मिठी; सोडायला सांगूनही सोडेना, वर म्हणतो- किस करू का? भर कार्यक्रमात अभिनेत्याने ओलांडल्या मर्यादा

SCROLL FOR NEXT