छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या १२ हजार मिनी किट्स वाटणार

CD
जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या १२ हजार मिनी किट्स वाटणार --- महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन ---- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २९ ः जिल्ह्यात कमी पर्जन्यमान आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियानांतर्गत रब्बी ज्वारी बियाणे मिनी किट वितरण योजना २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी परभणी जिल्ह्याला १२ हजार ७१० मिनी किट्स म्हणजेच एकूण ५०८.४० क्विंटल बियाण्यांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई आणि कमी पर्जन्यमानामुळे शेतीसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ज्वारी हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, जनावरांसाठी चारा म्हणूनही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे सुधारित वाणांचा प्रसार करून उत्पादनवाढ साधण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक मिनी किटमध्ये चार किलो प्रक्रिया केलेले सुधारित वाणाचे ज्वारी बियाणे, जैविक खताचे पाकीट आणि पीक लागवड तंत्रज्ञानासंबंधी माहितीपत्रक दिले जाणार आहे. दहा वर्षांच्या आतील सुधारित वाणांच्या बियाण्यांचा प्रसार करून शेतकऱ्यांना आधुनिक पीक व्यवस्थापनासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थींची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पोर्टलवर अर्ज करावा. पात्र व निवड झालेल्या शेतकऱ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनी किट्सचे वितरण करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देऊन उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करावा आणि रब्बी ज्वारीच्या पेरणीचे स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

SCROLL FOR NEXT