छत्रपती संभाजीनगर

रब्बीची अनिश्चितता, आता मनरेगावर भिस्त

CD
रब्बीची अनिश्चितता, आता मनरेगावर भिस्त ---- काढणीची कामे घटली; बांधकामासह अन्य कामांचा शोध --- धाराशिव, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे शेतीकामे जवळपास ठप्प झाली आहेत. खरीप हातातून गेल्याचा फटका शेतमजुरांनाही बसला आहे. सध्या शेतामध्ये कामेच उपलब्ध नसल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा व रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी खरिपातील पिकांच्या काढणीच्या हंगामात शेतमजुरांना सलग दोन महिने हाताला काम मिळायचे. त्यातून मिळालेल्या मजुरीवर त्यांच्या कुटुंबाचा काही महिन्यांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, यंदा सोयाबीनचे पीक वाया गेले असून, उत्पादनात मोठी घट झाली. पिकातून येणारा उत्पन्न खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊनच काढणीची कामे उरकली. काही शेतकऱ्यांनी मजुरीचा खर्च परवडत नसल्याने हार्वेस्टरचा वापर करून सोयाबीनची काढले. परिणामी, यंदा शेतमजुरांना दरवर्षीच्या तुलनेत काढणीची कामे कमी मिळाली. ज्या ठिकाणी कामे मिळाली, तिथेही मजुरांना अपेक्षित मजुरी मिळाली नाही. सहा ते दहा मजूर एकत्रित येऊन सोयाबीन काढणीची कामे घेत असत. सामान्यतः खरिपाची काढणी आटोपल्यानंतर शेतकरी रब्बीच्या पेरणीच्या तयारीला लागतात, ज्यातून मजुरांना काही प्रमाणात काम उपलब्ध व्हायचे. परंतु, यंदा खरीप संपत आला, तरी जमिनीत पुरेसा ओलावाच नसल्याने रब्बीची पेरणी होणार की नाही, याबद्दल मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी काळातही शेतीत काम मिळण्याची शक्यता मावळली आहे. ------ रोहयोच्या कामांवर भिस्त शेतातील बहुतांश कामे ठप्प झाल्यामुळे अनेक शेतमजुरांनी बांधकामासह अन्य मजुरीची कामे शोधण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील मजुरांची संपूर्ण भिस्त आता रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवरच अवलंबून आहे. मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रशासनाकडूनही हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरूपाची कामे प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विहीर, गोठा, रस्ते, जलतारा, घरकुल, यंत्रणामार्फत फळगाव, रेशीम, रोपवाटिका, जलसंधारण आदी कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतमजुरांना आगामी काळात काही दिवस या कामांचा आधार मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतमजुरांची भिस्त आता हमी योजनेच्या कामावरच असल्याची स्थिती सध्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

SCROLL FOR NEXT