छत्रपती संभाजीनगर

रब्बीच्या पेरणीला विजेचा खोडा

CD
रब्बीच्या पेरणीला विजेचा खोडा ---- कमी-अधिक दाबामुळे मोटारी जळण्याचे प्रकार वाढले --- हिंगोली, ता. २ (बातमीदार) : जिल्ह्यातील बहुतांश भागांत शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत. विहीर, कूपनलिका आणि शेततळ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या आधारावर गहू, हरभरा यांसह विविध रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत भर पडली असून, कमी-अधिक दाबामुळे पंप जळण्याचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी दोन लाख २५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, यंदा अत्यल्प पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. तसेच विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युतपंपांचा वापर करतात. मात्र, सध्या वीजपुरवठा सुरळीत राहत नसून कमी-अधिक दाबाने वीज मिळत असल्याने विहीर आणि बोअरमधील मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. मोटार दुरुस्ती किंवा नवीन मोटार खरेदीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. --- रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता एकीकडे पाणीसाठ्याची कमतरता, तर दुसरीकडे अनियमित वीजपुरवठा अशा दुहेरी संकटामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बीचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. ---- मोटार जळताच दोन ते तीन हजारांचा फटका विहीर, बोअरमध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या (एचपी) मोटारी असतात. कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे, वीजपुरवठ्यात बिघाड होत असल्याने मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, एका वेळेस मोटार जळाली, तर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन हजार रुपयांचा फटका आहे. सात ते दहा एचपीच्या मोटारींना तीन ते चार हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

Dhanteras Horoscope: धनत्रयोदशीपासून 'या' ४ राशींचे अच्छे दिन! मालव्य राजयोगामुळे मिळणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायातही मिळणार घवघवीत यश!

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

SCROLL FOR NEXT