sambhaji sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : अवकाळीच्या संकाटानंतर रब्बी पेरणीला आला वेग

सोयगाव तालुक्यातील चित्र : शेतकऱ्यांची गहू, मका पिकांना पसंती

सकाळ वृत्तसेवा

जरंडी : अवकाळीच्या तडाख्यामुळे थांबलेल्या रब्बीच्या पेरण्यांची गती वाढली असून दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्या पासून पेरण्याचा वेग घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात रब्बीच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी मका आणि गहू पिकांना पसंती दिली आहे.

तालुक्यात दिवाळीच्या नंतर काही प्रमाणात रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात झालेल्या रब्बीच्या पेरण्यांमध्ये एक हजार ७२९ हेक्टरवर ज्वारी, गहू, मका, हरभरा, भुईमूग आणि करडई या सहा पिकांची पेरण्या झाल्या. परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस सलग पाच दिवस अवकाळीच्या संकटाने तडाखा दिल्यामुळे या रब्बीच्या कोवळ्या पिकांचे वाढीच्या अवस्थेत नुकसान झाले होते.

आधीच दुष्काळाच्या झळा अन् त्यात अवकाळीच्या कळा यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना ब्रेक दिला होता. परंतु डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ झाल्याने पुन्हा रब्बीच्या दुसऱ्या टप्प्यातील पेरण्या सुरू झाल्या आहे.

थंडीमुळे पेरण्या वाढल्या

सोयगाव तालुक्यात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक थंडीत वाढ झाल्याने गहू पिकांच्या पेरण्या वाढल्या आहे. रब्बीच्या पिकांची पीकविमा भरण्याची मुदत शुक्रवारी (ता.१५) संपली आहे. त्यातच रब्बीच्या नजर अंदाज आणेवारीची मदत (ता.३१) डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गुंतागुंत वाढणार आहे.

पहिल्या टप्प्यात

रब्बीच्या पेरण्या

  • ज्वारी ७०७ हेक्टर

  • गहू ३९४ हेक्टर

  • मका १०७४ हेक्टर

  • हरभरा ५१७ हेक्टर

  • भुईमूग २५ हेक्टर

  • करडई २ हेक्टर

  • एकूण पेरणी :

२ हजार ७२९ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

Vidarbha FDA Raids : वर्ध्यात ‘पतंजली’ सुपर मार्टवर छापा, तर यवतमाळमध्ये पान टपऱ्यांवर कारवाई; विदर्भात FDA ची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT