Beed Railway 
छत्रपती संभाजीनगर

बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण! गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून धावली ट्रेन

सकाळ वृत्तसेवा

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर रेल्वेची यशस्वी चाचणी.

आष्टी : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी (ता.२९) बारा डब्यांची रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी रेल्वे स्थानकावर पोहोचली असता खासदार प्रीतम मुंडे यांच्याहस्ते उदघाटन करून नंतर हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावली. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे, शंकर देशमुख उपस्थित होते.

नगर ते आष्टीपर्यंत रेल्वे येण्यासाठी तब्बल २६ वर्षांचा कालावधी लागला. रेल्वे बीड व परळीपर्यंत कधी धावणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाला १९९५ मध्ये तत्त्वतः मान्यता मिळाली. या रेल्वेमार्गासाठी दिवंगत खासदार केशरबाई क्षिरसागर, दिवंगत माजी मंत्री गोपीनाथराव मुंडे, दिवंगत मंत्री डॉ. विमलताई मुंदडा, खासदार रजनी पाटील, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीने आंदोलनाच्या माध्यमातून मोठा हातभार लावला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीही यात विशेष लक्ष घातले. त्यामुळे नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले. नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी हायस्पीड रेल्वे (ताशी १४४ किलोमीटर) बारा डब्यांसह धावली. आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी, कडा व आष्टी येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रथमच आष्टी येथे आल्याने रेल्वे पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

अर्ध्या खर्चाचा भार उचलला अन्

अनेक वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी अर्धा खर्च राज्य सरकार करणार असा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांसह रेल्वे संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता. तेव्हापासून खऱ्या अर्थाने या मार्गाच्या कामाला गती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT