cook beating sakal
छत्रपती संभाजीनगर

Railway Food Track : कूकला झापड अन् अधिकाऱ्यांनाही सुनावले!

रेल्वे बोर्डाच्या प्रवाशी सेवा सुविधा समितीने सोमवारी (ता. दहा) रेल्वेस्थानकावर पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

रेल्वे बोर्डाच्या प्रवाशी सेवा सुविधा समितीने सोमवारी (ता. दहा) रेल्वेस्थानकावर पाहणी केली.

छत्रपती संभाजीनगर - रेल्वे बोर्डाच्या प्रवाशी सेवा सुविधा समितीने सोमवारी (ता. दहा) रेल्वेस्थानकावर पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या फूड ट्रॅकमधील गैरसोय आणि खराब झालेले अन्नघटक पाहून समितीने कॅन्टीन चालकाला धारेवर धरले. मात्र, संधी मिळताच क्षणार्धात अन्न फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने समितीच्या एका सदस्याने कॅन्टीन कुकचा हात पिरगाळत चक्क झापडच लगावली, अन शिव्यांचीही लाखोली वाहिली!

रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड प्रवाशांच्या सुविधांवर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, अनेक वेळा प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. म्हणूनच रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सुविधा तपासण्यासाठी स्वतंत्र ‘प्रवाशी सेवा सुविधा समिती’ नियुक्त केलेली आहे. विविध रेल्वेस्थानकांना भेटी देवून सुविधा तपासणे आणि त्याच्यावर योग्य कारवाई किंवा कार्यवाही करण्याची शिफारस करण्याचे काम ही समिती करते. सोमवारी (ता. १०) शहरात रेल्वेस्थानकावर प्रवासी सेवा सुविधा समितीचे डॉ. राजेंद्र फडके (जळगाव), कैलाश वर्मा (मुंबई), अभिजित दास (पश्चिम बंगाल), विभाश्री अवस्थी (छत्तीसगड) आणि सुनील राम (पटना) हे आले होते. त्यांनी रेल्वेस्थानकावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला.

सुरवातीलाच सदस्यांनी रेल्वेस्टेशनवरील फूड ट्रॅकमध्ये प्रवेश केला. थेट किचनमध्ये जाऊन बनविलेल्या पदार्थांची तपासणी केली. टोमॅटोची प्युरी असलेले एक भांडे झाकून ठेवलेले होते. डॉ. राजेंद्र फडके यांनी त्याचा वास घेतला, तेव्हा ते खराब झालेले लक्षात आले. यावेळी इतर दोन सदस्यांनीही त्याची खातरजमा केली. दरम्यान समितीतील इतर दोन सदस्य दुसरीकडे पाहणी करत होते. त्यामुळे डॉ. फडके हे त्यांना बोलवण्यासाठी बाहेर गेले. यावेळी संधी मिळताच कर्मचाऱ्याने खराब झालेला पदार्थ फेकून दिला आणि भांडे रिकामे करून ठेवले. सर्व सदस्य पुन्हा किचनमध्ये दाखल झाल्यानंतर हा प्रकार पाहून डॉ. फडके यांना संताप अनावर झाला. रिकामे भांडे फेकत त्यांनी आदळआपट केली, त्यानंतर थेट कुकला त्यांनी झापड मारली. त्यानंतर शिव्यांची लाखोलीही वाहिली आणि कॅन्टीनला सिलही ठोकण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले.

पाणी कसे पिणार?

रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी ग्लास नसल्याने पाणी कसे पिणार, असा सवाल विचारत अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. यावेळी स्थानकावर असुविधा, प्लॅटफॉर्मवर बाकडे, पंखे नाही आणि जेथे पंखे आहेत त्याखाली बाकडे नाहीत अशा एकूणच स्थितीवरुन समितीने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT